महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Embarrassing And Shocking : कोवळ्या कळीला बाप, भाऊ, आजोबा, मामानेही सहा वर्षे उपभोगले - बंडगार्डन पोलीस स्टेशन

पुण्यातील बंड गार्डन परिसरात (Bund Garden area in Pune) ताडीवाला रोड येथेलाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ११ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि मामानेही सुमारे सहा वर्षांपासून (A minor girl was raped by her father, brother, grandfather and uncle for six years) अत्याचार केला.

Embarrassing And Shocking
अकरा वर्षिय मुलीवर बापानेच केला लैंगिक अत्याचार

By

Published : Mar 19, 2022, 1:15 PM IST

Updated : Mar 19, 2022, 2:55 PM IST

पुणे: पुण्यातील बंड गार्डन परिसरात (Bund Garden area in Pune) ताडीवाला रोड येथेलाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ११ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि मामानेही सुमारे सहा वर्षांपासून (A minor girl was raped by her father, brother, grandfather and uncle for six years) अत्याचार केला. समुपदेशनाच्यावेळी हा प्रकार समोर आल्यानंतर त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांची प्रतिक्रिया

११ वर्षाची ही मुलगी कोरेगाव पार्क भागात एका इंग्लिश मीडियम शाळेत शिकते. शाळेत वयात येणाऱ्या मुलींसाठी समुपदेशनाचा उपक्रम सुरू होता. समुपदेशक मुलांना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या. तेव्हा ही मुलगी घाबरली नंतर तीने समुपदेशकांना आपल्यावर गेल्या ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन बंड गार्डन पोलिसांनी पिडित मुलीचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकाराला तीन ते चार वर्षापासून सुरुवात झाली, पहिल्यांदा 2017 मध्ये मुलगी बिहार येथे असताना,आणि घरात कोणी नसताना आपल्याच मुलीबरोबर जबरदस्ती ने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2020 मध्ये पीडित मुलगी ताडीवाला रोड येथे असताना तिच्या मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी दिली. यानंतर 2021 मध्ये देखील तिच्या आजोबांनी आणि चुलत मामांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केले. (A minor girl was raped by her father, brother, grandfather and uncle for six years) आता या साऱ्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन (Bundgarden Police Station) येथे गुन्हा दाखल झाला असून. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 19, 2022, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details