पुणे - राज्यभरात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी विजा पडण्याचे प्रकारही घडत आहेत. खेड तालुक्यातील चिंचोशी येथे शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, दोघे जण जखमी झाले आहेत.
खेड तालुक्यात अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी - khed
हरिदास गोकुळे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी अंब्याच्या झाडाखाली शेतकरी बसले होते. या झाडावरच विज कोसळली. यात एकजणाचा जागीच मृत्यू झाला.
हरिदास गोकुळे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी अंब्याच्या झाडाखाली शेतकरी बसले होते. या झाडावरच विज कोसळली. यात एकजणाचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकट डोक्यावर आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना उकाड्यातून दिलासा मिळत आहे. पण, विज पडण्यासारख्या दुर्घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.