पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ जण कोरोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या चिमुकलीचा आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 132 वर पोहचली असून आत्तापर्यंत 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधितांचा वाढत असून यात पुण्याच्या रुग्णांची देखील भर पडली आहे. कारण पुणे शहरातील अनेक रहिवाशी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या 9 कोरोना बाधित रुग्णांमध्ये पुण्याच्या राहिवाशांचाही समावेश आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये दीड महिन्याची चिमुकली आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. कोरोना बाधित पुरुषांचे वय हे 11, 22, 39, 61, 74, अशी आहेत तर स्त्रियांचे 37 व 75, असे वय आहे.
हे सर्व कोरोना बाधित रुग्ण तळवडे, रुपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी, शिवाजीनगर पुणे, येथील आहेत. यात पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यावर देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 5 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन चिमुकल्यांसह ९ कोरोनाग्रस्त आढळले, बाधितांचा आकडा 132 वर - पिंपरी-चिंचवडमधील बाधितांची संख्या आता 132 वर
पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ जण कोरोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या चिमुकलीचा आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील बाधितांची संख्या आता 132 वर पोहोचली आहे.
रुग्णालय