पुणे - शहरातील काँग्रेस भवनच्या मैदानावर गेल्या 80 वर्षांपासून दुर्गा पूजेच्या आयोजनाची परंपरा आहे. पुण्यातील सर्वात जुन्या बांगिया संस्कृती संसदतर्फे दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच ९ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते.
दुर्गा पूजेबद्दल माहिती देताना दुर्गोत्सवाच्या संयोजिका मधुमिता घोष पुण्यातील दुर्गा पूजेच्या या महोत्सवात बंगाली बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावर्षी महोत्सवात बंगाली फूड फेस्टिव्हल, आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंगाली खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - दसरा आला तरीही फुलांना योग्य बाजारभाव नाही, शेतकरी चिंतेत
या ठिकाणी महाअष्टमीच्या दिवशी पूजेनंतर महाभारतावर आधारित धर्म-अधर्म या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर, महानवमीला सायंकाळी लंबाडा नृत्य सादर करण्यात आले. तसेच विजयादशमीला सकाळी दर्पण विसर्जन पूजा आणि सिंदूर खेलाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दुर्गोत्सवाच्या संयोजिका मधुमिता घोष यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - भाजपने मित्रपक्षांवर अन्याय केला नाही - चंद्रकांत पाटील