पिंपरी-चिंचवड (पुणे) - पुण्यात उपचार घेत असलेल्या एका 68 वर्षीय महिलेने कोरोना विषाणूवर मात केली आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पिंपरी-चिंचवड शहरातील त्यांच्या घरी सोडण्यात आले. यावेळी सोसायटीधारकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले.
68 वर्षीय महिलेने केली कोरोनावर मात; नागरिकांनी केले जंगी स्वागत - corona news pune
पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत दीड महिन्याचा चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाने, 81 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेनेही कोरोनाला हरवले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांनी यावर मात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत दीड महिन्याचा चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाने, 81 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेनेही कोरोनाला हरवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णलयात उपचार सुरू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन्ही हात वर करून सर्वांचे आभार मानले.