पुणे - शहरातील कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट बनत चालला आहे. बुधवारी 22 एप्रिलला पुणे शहरात दिवसभरात 64 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील डॉ. नायडू रुग्णालयामध्ये एकूण 562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेले 35 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 64 नवे रुग्ण - pune corona latest numbers news
दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील डॉ. नायडू रुग्णालयामध्ये एकूण 562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेले 35 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 64 नवे रुग्ण
शहरात 26 गंभीर असलेल्या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 18 रुग्ण ससूनमध्ये तर इतर आठ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह पुण्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या 772 झाली आहे.