पुणे -विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 646 वर गेली असून, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 520 आहे तर 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून, हे सर्व पुण्यातील आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे शहरात 58 नवीन कोरोनाग्रस्तांची भर..तर एकूण विभागामध्ये रुग्णांची संख्या 646 - pune corona update
पुणे विभागात 646 कोरोनाबाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 कोरोनाबाधित रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे विभागात 646 कोरोनाबाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 कोरोनाबाधित रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 14 बाधित रुग्ण असून 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधित रुग्ण असून, कोल्हापूर जिल्ह्यात 6 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आजपर्यत पुणे विभागामध्ये एकूण 8 हजार 188 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 588 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून, 646 चा अहवाल पॉझिटिव्ह आहेत.