पुणे- शहरात एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशात आज कोरोनासबंधी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील ५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. हे पाचही कोरोनाबाधित रुग्ण एकाच कुटुंबातील असून १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे दोन्ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या पाचही जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
पुण्यात ५ कोरोनाबाधित ठणठणीत; रुग्णालयातून मिळाली सुट्टी - corona pune
शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जणांचा महापालीकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात, तर ४ जणांचा ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९० एवढी झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ एवढी झाली आहे.
डॉ. नायडू रुग्णालय
दरम्यान, शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जणांचा महापालीकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात, तर ४ जणांचा ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९० एवढी झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ एवढी झाली आहे. शहरात एकूण २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.