पुणे - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण 2 हजार 233 आहे. तर 2 हजार 275 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 177 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 123 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 903 आहेत.
पुणे विभागात 4 हजार 744 कोरोनाग्रस्त, तर 2 हजार 275 रुग्ण बरे होऊन घरी
पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण 2 हजार 233 आहे. तर 2 हजार 275 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात आज 122, सोलापूर जिल्ह्यात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 8, सातारा जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्हयात 138 कोरोनाबाधीत रुग्ण असून 69 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 67 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 390 कोरोनाबाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 214 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 50 कोरोनाबाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 असून, एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयात 43 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 32 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत विभागामध्ये एकुण 52 हजार 462 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 44 हजार 983 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 539 नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 40 हजार 180 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 4 हजार 744 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 14 लाख 65 हजार 859 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 92 लाख 30 हजार 712 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 80 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.