महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात बुधवारी ४ हजार ४५८ पॉझिटिव्ह रुग्ण; मृतांचा आकडाही मोठा

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान या वाढत्या आकड्यासोबत डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील मोठा आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. आज दिवसभरात ३ हजार ३७४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे कोरोना
पुणे कोरोना

By

Published : Mar 31, 2021, 10:53 PM IST

पुणे - शहरात बुधवारी ३१ मार्चला दिवसभरात ४ हजार ४५८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान या वाढत्या आकड्यासोबत डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील मोठा आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. आज दिवसभरात ३ हजार ३७४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पुण्यात करोनाबाधित ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ११ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात ७९९ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २ लाख ६९ हजार ३४३ इतकी झाली आहे. पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ३३ हजार ८५८ वर पोहचली असून एकूण मृत्यू ५३०२ इतके झाले आहेत. आजपर्यंत एकूण २ लाख ३० हजार १८३ इतके रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आज १६ हजार ४४६ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details