बारामती - इंदापूर तालुक्यातील सात ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाासाठी राज्य सरकारनं तब्बल ४१३ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी मंजूर
इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ४१३ कोटींचा निधी मंजूर - 413 crore sanctioned for roads in Indapur taluka
तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामं या निधीतून केली जाणार आहे. यामुळं तालुक्यातील दळवळणाच्या सुविधा वाढणार असल्यानं नागरिकांना याचा फायदा होईल.
चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्यभरातील रस्त्यांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. यामध्ये एकट्या इंदापूर तालुक्यातील सात रस्ते बनवण्यासाठी तब्बल ४१३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भिगवण खानोटा ते बारामती रस्त्यांसाठी २१७ कोटी ६८ लाख, भवानीनगर ते शेटफळगढे ते खडकी रस्त्यासाठी १७३ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न लागणार मार्गी
याशिवाय तालुक्यातील बोरी ते शेळगाव रस्त्यासाठी ६ कोटी, अंथूर्णे ते भरणेवाडी बिरंगुडवाडी रस्त्यासाठी ५ कोटी, कर्मयोगी साखर कारखाना ते निमगाव केतकी रस्त्यासाठी ३ कोटी, पुणे-सोलापुर हमरस्ता ते बाभूळगाव भाटनिमगाव ते भांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी व इंदापूर ते बेडशिंगे ते अवसरी ते भांडगाव रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दशकांपासून रक्षणासाठी वंचित असलेल्या खेड्यापाड्यातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
हेही वाचा -बारामती उपविभागात गव्हाची सरासरीच्या १०० टक्के क्षेत्रावर पेरणी