महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील 'या' चार ठिकाणी शिव भोजनालय सुरू; गरजूंना मिळणार मोफत जेवन - तहसीलदार सुचित्रा आमले

अत्यावश्यक सेवा, किराणामाल, भाजीपाला या सेवाही घरपोच उपलब्ध करून दिल्या जात असताना नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे, कामगार वर्गाची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आळंदीत १ चाकणमध्ये २ आणि राजगुरुनगरमध्ये १, अशा पद्धतीने ४ शिवभोजनालय उभारण्यात आले असून या ठिकाणी चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

shivbhojan pune
प्रतिकात्मक

By

Published : Apr 2, 2020, 9:05 PM IST

पुणे- आळंदी, चाकण, खेड या परिसरात मोठ्या संख्येने अनेक कामगार कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे कामगार वर्गाला वेळेवर जेवण उपलब्ध व्हावे म्हणून आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर येथे ४ शिवभोजनालय सुरू करण्यात आले असून प्रत्येकी ५ रुपये प्रमाणे पार्सल जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच ज्याच्या कडे पैसे नाही, अशांना शिवभोजनालयामध्ये मोफत जेवण मिळाणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

माहिती देताना तहसीलदार सुचित्रा आमले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर या परिसरात सक्तीचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, किराणामाल, भाजीपाला या सेवाही घरपोच उपलब्ध करून दिल्या जात असताना नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे, कामगार वर्गाची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आळंदीत १, चाकणमध्ये २ आणि राजगुरुनगरमध्ये १ अशा पद्धतीने ४ शिवभोजनालय उभारण्यात आले असून या ठिकाणी चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details