पुणे - आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून तब्बल साडेतीनशे महिलांनी कॅनव्हासवर पायाने चित्र साकारले. शहरातील पॅव्हेलियन मॉलमध्ये या महिलांनी चित्र साकारत जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला.
अनोखा महिला दिन; 350 महिलांनी एकत्र येत पायांनी साकारले 'पेंटिंग'
महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील ३५० महिलांनी पायांनी पेंटींग रेखाटले. याची नोंद गिनीज बूकमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आम्ही पुणे शहरातील विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान असणाऱ्या तीस महिलांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली होती. या तीस महिलांनी आपल्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकी दहा महिलांना एकत्र आणले आणि अशा प्रकारे जमलेल्या 350 महिलांनी पायामध्ये ब्रश पकडून एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग साकारल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक शुभम पांडे यांनी दिली.
पुणे शहरात, अशा प्रकारे प्रयोग झाला नसल्याचा दावाही आयोजकांनी केला. त्यांच्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही शुभम यांनी सांगितले.