महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी सुरू; आतापर्यंत ३३ हजार ३८५ कुटुंबांची तपासणी - corona latest news

आरोग्य विभागाच्या कंटेनमेंट अहवालानुसार बारामतीतील गुणवडी, मळद, समर्थ नगर, श्रीराम नगर, या भागातील ३३ हजार ३८५ कुटुंबियातील १ लाख ३४ हजार ७५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

corona testing in baramati
ॉकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ३३ हजार ३८५ कुटुंबांची तपासणी

By

Published : Apr 15, 2020, 8:39 AM IST

Updated : Apr 15, 2020, 9:36 AM IST

बारामती(पुणे) - कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ची अंमलबजावणी सुरू आहे. या पॅटर्ननुसार बारामतीत आरोग्य विभागामार्फत घरोघर जात तपासणी करून सर्दी, खोकला व तत्सम लक्षणांची नोंद घेतली जात आहे. ही लक्षणे ५ दिवसांच्या कालावधीनंतरही आढळून आल्यास पुढील उपचारासाठी सदर रुग्णांना (कोविड १९) च्या तपासणीसाठी पुणे येथे पाठवले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या कंटेनमेंट अहवालानुसार बारामतीतील गुणवडी, मळद, समर्थ नगर, श्रीराम नगर, या भागातील ३३ हजार ३८५ कुटुंबियातील १ लाख ३४ हजार ७५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत सर्दी, खोकला व ताप असणाऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानुसार वरील ठिकाणी ९ जणांना सर्दी व ताप असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ३३ हजार ३८५ कुटुंबांची तपासणी
राज्याच्या विविध भागात कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत असतानाच बारामतीतही ६ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला असून, इतरांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील ज्या भागात रुग्ण आढळून आले होते त्या भागासह लगतच्या परिसरात आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. ८ हजार १५० जणांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण-कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने बारामतीत शिरकाव केल्यानंतर विदेशातून आलेल्या ९२ आणि बाहेर गावातून आलेल्या ८ हजार १५० जणांसह कोरोना बाधित क्षेत्रातील २ हजार ४० अशा एकूण १० हजार २८२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. पैकी ८ हजार १५० जणांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
Last Updated : Apr 15, 2020, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details