पुणे - पुणे-सातारा रस्त्यावर खवड शिवापूरजवळ एका ट्रकने तीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हे सर्व तरुण पुण्यातील तळजाई टेकडी झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावर ट्रकने ८ जणांना उडवले, ३ जण जागीच ठार - झोपडपट्टी
पुणे येथील पुणे-सातारा रस्त्यावर खवड शिवापूरजवळ एका ट्रकने तीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
सोमवारी रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तरुण तळजाई टेकडीवर एकत्र आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास पार्टी करून केक कापून हे सर्वजण पुणे-सातारा रस्त्यावर शिवापूर येथे असलेल्या दर्ग्याच्या दर्शनाला निघाले होते. तीन दुचाक्यांवर आठ जण प्रवास करत होते.
मृतांमध्ये अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे यांचा समावेश आहे. तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींना ससेवाडीमधील श्लोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.