पुणे : जुन्नरमधील कल्याण नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा ठरतो आहे. जुन्नरमध्ये आळेफाट्यावर गेल्या आठवड्यात भीषण असा अपघात झाला होता. या अपघातात दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हा दुसरा अपघात आहे. या अपघाताची भीषणता एवढी होती की, एका गाडीतील सहा प्रवाशांपैकी 3 जणांचा मृत्यू जागीच झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे.
वेगाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात :नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात वाटखळ गावाजवळ इनोव्हा पिकअप समोरासमोर धडक झाली. इनोव्हा चालवणाऱ्या ड्रायव्हर गाडीवरील वेगाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे माहिती आहे. जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण मार्गावरील अपघात थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीती निर्माण झाली आहे. इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. पिकअप वाहन कल्याणच्या दिशेने चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे.
चालकाने वाहतुकीचे नियम पाळायला हवे : मृत झालेल्या व्यक्तींचे नावे आणखी समोर आलेले नाही. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्याला सुरुवात केली आहे. या महामार्गावर दिवसेंदिवस होणारे अपघात पाहता वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळायला हवे. त्याचबरोबर वाहतूक पोलीस सुद्धा या ठिकाणी असावेत, अशी मागणी नागरकांमधून होत आहे. जेणेकरुन अपघातचे प्रमाण कमी होईल. रात्री 9 दरम्यान हा अपघात झाला आहे.
वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या होत्या. या अपघात प्रकरणी शांतीनगर आणि नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांना अटक करण्यात आली होती. पहिल्या घटनेत भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिल्पा चौकात एका आयशर टेम्पो चालकाने टेम्पो भरधाव वेगात १७ वर्षीय मुलीला जोरात धडक दिली होती. दुसऱ्या घटनेत वाहतूक पोलिसांच्या दुचाकीला रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला होता.
हेही वाचा : Thane Accident : ठाणे जिल्ह्यात अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; तरुणीला टेम्पोने तर पोलिसाला ट्रकने उडविले