महाराष्ट्र

maharashtra

Inmates In Open Prisons In Pune: कारागृहातील गर्दी टाळण्यासाठी २० टक्के कैदी खुल्या कारागृहात

By

Published : Mar 3, 2023, 7:47 PM IST

राज्यातील कारागृहांच्या भिंती कैद्यांच्या भरमसाठ संख्येने भरू लागल्या आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची गर्दी झाली असून ही गर्दी टाळण्यासाठी खुल्या कारागृहांची क्षमता २० टक्क्यांनी वाढविली जाणार आहे. तसेच पात्र ठरलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात वर्ग केले जाणार आहे.

Inmates In Open Prisons In Pune
पुणे कारागृहातील कैदी

पुणे:कारागृहात एक वर्षांवरील शिक्षा झालेल्या सर्व बंद्यांना निव्वळ एक वर्ष किंवा जन्मठेपेच्या बाबतीत ५ वर्ष शिक्षा भोगल्यानंतर खुल्या कारागृहात वर्ग करण्यात येते. खुल्या कारागृहात बंद्याने एक महिना शिक्षा भोगल्यानंतर ३० दिवसांची सर्वसाधारण माफी देण्यात येते. कारागृहात बंद्यांची व नातेवाईकांची भेट प्रत्यक्ष समोरा-समोर करण्यात येत असते. तसेच बंद्यांना खुल्या कारागृहाच्या शेती व कारखाना विभागात काम दिले जाते.


राज्यात १९ खुली कारागृह: सध्या राज्यात १९ खुली कारागृह असून त्यांची क्षमता १५१२ पुरुष व १०० महिला कैद्यांची आहे. २०२२ मध्ये खुल्या कारागृहासाठी पात्र असलेल्या १५७१ पुरुष व ४५ महिला कैद्यांना खुल्या कारागृहासाठी पात्र करण्यात आले होते. परंतु, पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने बरेच कैदी वर्ग करता आले नाहीत. कारागृह प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये खुले कारागृहाची बंदी क्षमता साधारणपणे २० टक्क्यांनी वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.


कारागृह प्रशासनाचा निर्णय:तसेच भादंवि ३९२ ते ४०२ कलमांमध्ये शिक्षा सुनावलेल्या कैद्यांची शिक्षा संपल्यानंतर त्यांना खुल्या कारागृहासाठी पात्र करणे, इतर कलमातील उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी कैद्यांना खुल्या कारागृहात तसेच ६० वर्षे व त्यावरील वय असलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात वर्ग करावे, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे. संघटित गुन्हेगारी/देशविघातक कारवाया/दहशतवादी कारवाया/नक्षलवादी /NDPS (अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा ) बलात्कारी गुन्हे/व्यावसायिक खुनी व इतर अतिगंभीर गुन्ह्यातील बंदी वगळता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कारागृहासमोर ठिया आंदोलन: पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांना योग्य सुविधा मिळाल्या जात नाहीत आणि कायद्याचे मृत्यू होतात. त्यामुळे कैदी सुद्धा माणसे आहेत आणि त्यांच्यावर अन्याय कारागृहाकडून केला जात आहे, असा आरोप पुण्याच्या कारागृहात मृत पावलेल्या कैद्याच्या नातेवाईकांकडून 2 जानेवारी, 2023 रोजी आंदोलन करण्यात आले. येरवडा तुरुंगात 3 कैद्यांचे मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर कैद्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आज पुण्यातील येरवडा कारागृहासमोर ठिया आंदोलन केले.

आंदोलकांचा प्रश्न: येरवडा तुरुंगात 3 कैद्यांचे मृत्यू झाले. त्यातील एक कैदी हा सिंहगड भागातील डोणजे गावातील रहिवासी होता. दुसरा बारामती मधील तर तिसरा हा पुणे शहर येतील असल्याचे माहिती मिळाली आहे. कारागृह प्रशासनाकडून प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. दोन हजार रुपये कैद्यासाठी पाठवले तर त्यातील पाचशे रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचतात. या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि निर्दोष असणाऱ्या काही लोकांना तपासा अभावी तुरुंगात टाकलेला आहे. तर तपास कधी होणार असा सुद्धा सवाल या आंदोलकांनी केलेला होता.

हेही वाचा:CM Eknath Shinde : तब्बल 2 कोटी चहावर खर्च; मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे येणारे लोक सोन्यासारखे

ABOUT THE AUTHOR

...view details