पुणे - आंबेगाव तालुक्यातील वळती लोंढेवस्ती येथे ऊस तोडणी सुरू असताना दोन बछडे आढळून आले. ८ ते १० तासांच्या वनविभागाच्या प्रयत्नानंतर अखेर या बछड्यांना आपल्या आईपर्यंत सुखरूप सोडण्यात वनविभागाला यश आले . दोन्ही बछडे मादीच्या कुशीत सुरक्षित गेल्याने वनविभागाने निश्वास सोडला.
ऊसाच्या फडात आढळले बिबट्याचे बछडे, आईपर्यंत पोहोचवण्यात वनविभागाला यश
सध्या खेड आंबेगाव जुन्नर शिरूर परिसरामध्ये ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे बिबट्याच्या वास्तव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच बिबट्याचे चिमुकले बछडे बिबट्या मादीपासून दुरावली जात आहेत. त्यामुळे बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बिबटे ऊस शेतीला जंगल समजून गेल्या अनेक दिवसांपासून ऊस शेतीत वास्तव्य करू लागले आहेत. त्यातूनच माणुस व बिबटे यांच्यातला संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातून बछडे व बिबटे यांच्यातला दुरावा वाढला आहे. पुढील काळामध्ये गरज आहे ती बिबट्याच्या संगोपनाची. त्यासाठी वनविभागाकडून मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. मात्र नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.