पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात विविध कामासाठी आलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात गुरुवारी (दि.14 मे) दुपारी पुणे स्टेशन येथून श्रमिक रेल्वेने रवाना करण्यात आले आहे. यात तब्बल 1 हजार 455 परप्रांतीय मजूर होते. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच बण्याच्या बाटल्या आणि फूड पॅकेट्सही देण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधून अठराशे परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रेल्वे, एसटीने रवाना
पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणी अडकलेल्या सुमारे 1 हजार 800 परप्रांतीय नागिरकांना रेल्वे व बसच्या सहाय्याने त्यांच्या राज्यात सोडण्यात आले.
जिल्ह्यातील काही मजुरांना एसटी बसच्या माध्यमातून परराज्याच्या सीमारेषेवर सोडण्यात येत आहे. वल्लभनगर बस स्थानकातून आज दिवसभरात भोसरी एमआयडीसी परिसरातील 341 मजुरांना मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील सीमांवर सोडण्यास बस रवाना झाली आहे. अशा प्रकारे आज दिवसभरात एकूण आठराशे परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंठे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस बंद