पुणे -येथील हडपसर परिसरातून पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गावठी बनावटीचे 18 पिस्तूल व 27 जिवंत काडतुसे व एक चोरीची मोटारसायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील हडपसर परिसरातून 18 पिस्तूल अन 27 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांची टोळी गजाआड - पुणे जिल्हा बातमी
पुण्यातील हपडपसर परिसरातून पोलिसांनी 18 पिस्तूल व 27 जिवंत काडतुसे जप्त केली असून सहा जणांच्या टोळीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
माहिती देताना पोलीस उपायुक्त