महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर परिस्थितीत अडकलेल्या 17 पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर

इंद्रायणी नदीचे रुप पाहून पर्यटक त्यांच्या सोबत येण्यास तयार नव्हते. तेव्हा शिवदुर्गच्या पथकातील काही व्यक्तींनी पर्यटकांची समजूत काढत लाईफ जॅकेट, बोट सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यटकांना दोरीच्या साह्याने, साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. पर्यटकांमध्ये काही लहान मुले व वयोवृद्धांचा देखिल समावेश होता. दरम्यान, इंद्रायणी नदी तुडुंब भरल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर परिस्थितीत अडकलेल्या १७ पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर

By

Published : Jul 28, 2019, 5:51 AM IST

Updated : Jul 28, 2019, 6:12 AM IST

पुणे- मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशामध्ये लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आलेले 17 पर्यटक ओशो आश्रमात अडकले होते. शिवदुर्गचे पथक आणि पोलिसांनी या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. हे सर्व पर्यटक गुजरातच्या अहमदाबाद येथील असून ते लोणावळा पर्यटनस्थळे फिरण्यासाठी आले होते.

पूर परिस्थितीत अडकलेल्या 17 पर्यटकांना शिवदुर्ग टीमच्या मदतीने पोलिसांनी काढले बाहेर

लोणावळा परिसरातील मळवली जवळच्या देवले भाजे गावच्या हद्दीमध्ये अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशामध्ये लोणावळा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक ओशो आश्रमात अडकले असल्याची माहिती, शिवदुर्गच्या टीमला शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिळाली. तेव्हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवदुर्गचे १५ जणांचे पथक कामशेत, लोणावळा ग्रामीण पोलिसांसह तिथे पोहोचले.

इंद्रायणी नदीचे रुप पाहून पर्यटक त्यांच्या सोबत येण्यास तयार नव्हते. तेव्हा शिवदुर्गच्या पथकातील काही व्यक्तींनी पर्यटकांची समजूत काढत लाईफ जॅकेट, बोट सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यटकांना दोरीच्या साह्याने, साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. पर्यटकांमध्ये काही लहान मुले व वयोवृद्धांचा देखिल समावेश होता. दरम्यान, इंद्रायणी नदी तुडुंब भरल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिवदुर्गच्या या टीमने पर्यटकांना काढले बाहेर -
सुनिल गायकवाड, राजेंद्र कडु, विकास मावकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, प्रणय अंभोरे, राहुल देशमुख, सागर कुंभार, दुर्वेश साठे, केदार देवाळे, चंद्रकांत बोंबले, ब्रिजेश ठाकुर, सनी कडु, अभिजीत बोरकर आणि ओंकार पडवळ

Last Updated : Jul 28, 2019, 6:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details