महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girl Rape Case Pune: पुण्यात वडिलांनी केला 16 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक - आरोपी वडिलास अटक

सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात एका वडिलांनीच स्वत:च्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 18 मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली आहे.

Girl Rape Case Pune
रेप केस

By

Published : Aug 14, 2023, 6:06 PM IST

पुणे : पुण्यात वडील, मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये वडिलांनी 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात मुलीच्या आईने तक्रार दिली असून ती आरोपीची पत्नी आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पीडितेच्या आईची पोलिसात तक्रार : या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की, 18 मे रोजी संध्याकाळी मुलगी घरात एकटी होती. यावेळी आरोपी वडिलांनी स्वत:च्या मुलीसोबत अश्लील कृत्य करत तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईने याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ :या घटनेवरून मात्र मोठी खळबळ उडाली असून वडील आणि मुलगी यांच्यातल्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. पुण्यात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अशा गुन्हेगारांना शिक्षा देणे गरजेचे आहे. तरच मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि वाढणाऱ्या घटना थांबवता येतील.

20 वर्षीय मुलीवर पित्याचा बलात्कार : पुण्यात यापूर्वीही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. डिसेंबर, 2022 मध्ये जन्मदात्या पित्यानेच त्याच्या 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली होती. 46 वर्षीय वडील असलेला आरोपी 20 वर्षीय वयाच्या आपल्या मुलीवर 4 वर्षांपासून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचार करण्यासाठी पीडित मुलीची आई आणि आईचा मित्र हे सर्व आरोपीला मदत करत होते. पीडित तरुणीवर अत्याचार करणारा बाप गॅरेजमध्ये कामाला होता. हे मूळचे कुटुंब ओडिशा या राज्याचे आहे.

कुटुंब मुळचे ओडिसा राज्यातील : ओडिसा राज्यातील हे कुटुंब असून शारीरिक हव्यासापोटी या व्यक्तीने नात्याची सुद्धा तमा बाळगता स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले. त्याला अत्याचार करतेवेळी त्याची आई आणि तिचा मित्र मदत करत होता. आईचा मित्र असलेलासुद्धा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून जवळच निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा:

  1. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
  2. Buldana Rape Incident : बुलडाण्यातील बलात्काराची ती घटना खरी; पण महिला तक्रार देणार नाही - आ. संजय गायकवाड यांचा दावा
  3. Beed Rape Case : 14 वर्षीय मुलीवर 24 वर्षीय नराधमाने केला अत्याचार, पिडिता 7 महिन्याची गर्भवती

ABOUT THE AUTHOR

...view details