महाराष्ट्र

maharashtra

चिंताजनक..! पुण्यात दोन दिवसात 16 जणांचा मृत्यू; एकूण आकडा...

By

Published : Apr 9, 2020, 8:21 PM IST

पुण्यातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचा आकडा आता 24 वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक 16 मृत्यू हे ससून रुग्णालयात झाले आहेत. तर इतर 8 मृत्यू हे वेगवेगळ्या रुग्णालयात झाले आहेत.

16-people-died-due-to-corona-virus-in-pune-in-past-48-hours
16-people-died-due-to-corona-virus-in-pune-in-past-48-hours

पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यातच कोरोनाशी झुंज देताना अनेकांचा मृत्यूही होत आहे.
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन दिवसात 16 कोरोना बाधित रुग्णांचा वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यात आज (गुरुवारी) 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- सचिनने अंजली वहिनीसोबत 'डार्लिंग, आंखें चार करने दो' गाण्यावर केला डान्स, हरभजनने सांगितली आठवण

बुधवारी 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचा आकडा आता 24 वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक 16 मृत्यू हे ससून रुग्णालयात झाले आहेत. तर इतर 8 मृत्यू हे वेगवेगळ्या रुग्णालयात झाले आहेत. दरम्यान, पुण्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 210 वर पोहचली आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 15 वा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details