महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, बऱ्हाणपूरच्या पोलीस उपमुख्यालयाला १४२ कोटी निधी मंजूर

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या आराखड्याला राज्याच्या गृह मंत्रालयाने २८ ऑगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी राज्याच्या गृह मंत्रालयाने उपमुख्यालयाच्या प्रशासकीय इमारत व निवास्थानांच्या उभारणीसाठी लागणाऱ्या १४२.६२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली असल्याने उपमुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Barhanpur police sub-headquarters news
Barhanpur police sub-headquarters

By

Published : Mar 8, 2021, 8:08 AM IST

पुणे -बऱ्हाणपूर येथे होत असलेल्या पोलीस उपमुख्यालयाला राज्य शासनाच्या वतीने १४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यानिमित्ताने बऱ्हाणपूरसारख्या जिरायती भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच हे पोलीस उपमुख्यालय बारामतीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरणार आहे.

पोलीस उपमुख्यालयाची ही इमारत परिपूर्ण बनवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याच्या गृह विभागाने ५ मार्च रोजी २२० कोटी रुपयांचा नियोजित उपविभागाच्या आराखड्यात १४२.६२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारती व सेवा निवास्थाने यांचे बांधकाम केले जाणार आहे. याचे अंदाजपत्रक मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासल्यानंतर त्यास १४२.६२ कोटी रुपये सुधारित करून प्रशासकीय सहमती प्रशासकीय मान्यता देण्यास संमती दिली.

२८ पोलीस ठाण्यांचा समावेश होणार.....

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या आराखड्याला राज्याच्या गृह मंत्रालयाने २८ ऑगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी राज्याच्या गृह मंत्रालयाने उपमुख्यालयाच्या प्रशासकीय इमारत व निवास्थानांच्या उभारणीसाठी लागणाऱ्या १४२.६२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली असल्याने उपमुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ५० एकरावर हे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. पोलीस उपमुख्यालयाच्या आराखड्याला राज्याच्या गृह मंत्रालयाने २८ ऑगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर लगेच मूलभूत सुविधांसाठी २ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या उपमुख्यालयाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होत असते. या उपमुख्यालयामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय कार्यरत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ८ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश होणार आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, मुख्यालयापासूनचे अंतर, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये व गुन्ह्याच्या संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलिस बंदोबस्त येईपर्यंत तीन ते साडेतीन तासांचा कालावधी जातो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होते. जिल्ह्याच्या आस्थापनेवर एकच पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला होता.

हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!

ABOUT THE AUTHOR

...view details