पुणे- जिल्ह्यातील शिरूर येथून पळून गेलेले तबलीगचे १० लोक हे २३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. हे १० लोक मरकझ नंतर पुण्यात आलेले नसून ते आधीच पुण्यात आले होते, असा खुलासा पुणे विभागीय पोलीस आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केला आहे.
तबलीगचे 10 लोक जिल्ह्यातल्या शिरूर येथून पळून गेल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हा खुलासा केला आहे. पुण्यातील ज्या १० लोकांनी निजामुद्दिन येथील मरकझमध्ये सहभाग घेतला होता त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, यावर हे १० लोक मरकजच्या आधीच पुण्यात आले होते, असे आयुक्तनी स्पष्ट केले आहे. हे १० लोक २१ फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्याला आले होते आणि पुण्यातच ६ मार्चपर्यंत होते. ६ मार्चला हे लोक शिरुरमधे शिफ्ट झाले. शिरुरच्या एका मस्जिदमध्ये ते थांबलेले होते. १ एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दिनची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना विलगीकरणाचे शिक्के मारण्यात आले. मात्र, ते लोक फरार झाले आहेत.