परभणी - मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे, कशाला करता पंचनामे, काय लावला पंचनामा ? असा सवाल करत शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली होती. आता नशिबाने तेच मुख्यमंत्री आहेत'. त्यामुळे त्यांच्याच शब्दात त्यांना सांगतोय, की आता तुम्ही वाट बघू नका, पंचनामे न करता शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्या, अशी मागणी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
शेतकऱ्यांशी साधला संवाद -
मागील सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज रविवारी भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. परभणी तालुक्यातील दैठणा येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार मोहन फड, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, आनंद भरोसे, सुरेश भुमरे, रामराव वडकुते, रबदडे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
'मदत न मिळाल्यास शेतकरी रब्बीची पेरणी करू शकत नाही - '