महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अवकाळी' च्या थयथयाटात पीक जमीनदोस्त; पहा कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

अवकाली पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही परस्थिती परभणी तालुक्यातील शेतकरी उमेश देशमुख यांनी कवितेतून मांडली.

कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

By

Published : Nov 5, 2019, 12:15 PM IST

परभणी -अवकाळी तथा परतीच्या पावसाने शेतातील पिकांची केलेली नासाडी आणि त्यातून शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. यांची व्यथा परभणी तालुक्यातील मिरखोल गावचे शेतकरी उमेश देशमुख यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.

कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

(सोमवारी) त्यांच्या कवितेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची सद्यपरस्थिती मांडली आहे. शेतामधील सडलेले सोयाबीनचे पीक आणि शेतात साचलेले अवकाळी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या हातून गेलेले संपूर्ण खरीप स्पष्टपणे दाखवत आहे.

उमेश देशमुख यांच्याकडे मिरखेल परिसरात चार एकर शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र, दिवाळीपूर्वी कापून ठेवलेल्या सोयाबीनचे पीक अवकाळी पावसात अक्षरशः सडून गेल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details