परभणी- शुक्रवारी दुपारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एका वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा रात्री उशिरा नांदेड येथून आलेल्या 87 जणांच्या अहवालात आणखी सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 74 वर पोहोचली आहे.
परभणीत कोरोनाबाधितांचा आकडा 74 वर...
यामध्ये पूर्णा येथील 2 तर गंगाखेड 1, मानवत 1, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील 1 जिंतूर येथील 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ज्यामुळे रुग्ण संख्या आता 74 वर जाऊन पोहोचली आहे.
लॉकडाऊनचे साधारण दीड महिने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या परभणीत गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारपर्यंत 67 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात शुक्रवारी दुपारी आलेल्या 37 पैकी एका अहवालामुळे ती संख्या 68 वर जाऊन पोहोचली. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा 87 अहवाल परभणी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये पूर्णा येथील 2 तर गंगाखेड 1, मानवत 1, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील 1 जिंतूर येथील 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ज्यामुळे रुग्ण संख्या आता 74 वर जाऊन पोहोचली आहे. याप्रमाणेच अजूनही जिल्ह्यातील जवळपास तीनशे संशयित रुग्णांचे अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. जोपर्यंत या अहवालांचा निकाल परभणीत येऊन पोहोचत नाही, तोपर्यंत नेमकी परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या किती आहे? हे स्पष्ट होणार नाही. यामुळे अजूनही परभणीकरांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येवरून धाकधूक कायम आहे.