परभणी- विशाखापट्टनम येथून काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला गांजा परभणी शहरातील काही महिलांनी घरात दडवून ठेवला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकला असता, सुमारे लाख रुपयांचा 31 किलो गांजा सापडला. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह एका पुरुष आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
परभणीत 95 हजारांचा गांजा जप्त शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहु नगर येथे पांडुरंग महादेव कसबे याच्या घरी शोभा उर्फ रुक्साना सलीम अन्सारी (रा. भीम नगर, परभणी) व धोंडाबाई विठ्ठल नेमाने उर्फ धोंडाबाई लक्ष्मण शेळके (रा. रमाबाई आंबेडकर नगर, परभणी) यांनी अवैध विक्रीसाठी गांजाचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून शहर उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे यांनी शाहू नगर येथील पांडुरंग महादेव कसबे याच्या घरी पंच मयूर दत्तात्रय कुलकर्णी व आनंद शेषराव पाईकराव यांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत छापा घातला. तेव्हा त्याच्या घरात दोन प्रवासी बॅग व एक प्लास्टीक बॅगमध्ये एकूण 31.750 किलो ग्रॅम गांजा (किंमत ९५ हजार 250) गांजा आढळून आला.
हेही वाचा - सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचेच - सुप्रिया सुळे
पांडुरंग कसबे याची चौकशी केली असता, हा गांजा भिम नगर येथील त्याची मेहुनी शोभा आणि रमबाई आंबेडकर नगर येथील घोडाबाई विठ्ठल नेमाने यांनी अवैध विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यानुसार या दोन्ही महिलांना प्रत्यक्ष बोलावून हा गोजा त्यांनी कोठून आणला व कोणाला विकणार, याबाबत विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी विशाखापट्टणम येथे रेल्वेने जावून हा गांजा खरेदी केल्याचे व पुढे हा गांजा शांती नगर, भिवंडी-मुंबई येथे राहणाऱ्या मुस्कानभाई यास विक्री करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - पुर्णामध्ये सापडल्या डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या, 'एटीएस' ने एकाला केली अटक
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आलेवार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्य व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस) चे कलम २० ( ब ) ( २ ) ( क ) व २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुलै महिन्यात भिम नगर येथून मोठया प्रमाणात गांजा जप्त करून आरोपीतांविरुध्द कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय व अपर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे, पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, व्यंकटेश आलेवार, किशोर नाईक, बालासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, बबन शिंदे, हरिश्चंद्र खुपसे, सय्यद मोईन, अरुण पांचाळ, पवार, मगर व कोरडे यांनी केली.
हेही वाचा - 'आमदार आपल्या दारी' उपक्रमाचा साडेपाच हजार ऑटो रिक्षाधारकांना लाभ, सरकारी योजनांवरही मार्गदर्शन