परभणी -मोठा समूह करून सापासारख्या चालणाऱ्या 'त्या' विचित्र अळ्या आता परभणीतही आढळल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात अशा अळ्या आढळून आल्या होत्या. विचित्र अळ्या नेमका काय प्रकार आहे? हे कोडे सुटत नाही तोच, परभणीत देखील अशा प्रकारच्या अळ्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
शहरातील विकासनगर भागात राहणाऱ्या रोहिणी आणि उपासना सुधीर निर्मळ यांच्या घरातील अंगणामध्ये विचित्र अळ्या आज सकाळी दिसून आल्या. पाहता पाहता प्रचंड संख्येने अळ्यांचा समूह तयार झाला आणि अळ्या सापासारख्या चालू लागल्या. हा विचित्र प्रकार पाहून घरातील लोक भयभीत झाले. अळ्यांना पाहण्यासाठी संबंधीत ठिकाणी आजूबाजूचे नागरिक, महिला मोठ्या संख्येने जमा झाले होते. नेमका काय प्रकार आहे? अशी एकच चर्चा सुरू होती. काही कालावधीनंतर अळ्यांना कचराकुंडीमध्ये फेकून देण्यात आले.