महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शांतताप्रिय पालमला कुणाची नजर लागली? दंग्यानंतर राजकारणाचा संशय

दोन युवकांत किरकोळ बाचाबाची होऊन पालम शहर अक्षरशः पेटले. डझनावारी गाड्या पेटवून देण्यात आल्या. चहाचे हॉटेल्स आणि काही दुकाने जाळून टाकण्यात आली. चार चाकी गाड्या फोडण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. परंतु ही दंगल जेवढ्या तीव्रतेने भडकली, त्यावरून काही तरी राजकारण होतय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

By

Published : Jul 19, 2019, 12:40 PM IST

शांतताप्रिय पालमला नजर लागली का? दंग्यानंतर राजकारणाचा संशय


परभणी -पालम शहरात झालेला दंगा अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे ही घटना घडलीच कशी, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. कारण पालमला, अशा प्रकारची कुठलीही पार्श्वभूमी नाही. गेल्या वीस वर्षांत, असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याने शांतताप्रिय पालमला कुणाची नजर लागली का? असा सवाल उपस्थित होत आहे. सोबतच यात काही राजकारण शिजतय का, असा संशयदेखील या निमित्ताने आता व्यक्त होत आहे.

शांतताप्रिय पालमला नजर लागली का? दंग्यानंतर राजकारणाचा संशय

दोन युवकांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन पालम शहर अक्षरशः पेटले. डझनभर गाड्या पेटवून देण्यात आल्या. चहाचे हॉटेल्स आणि काही दुकाने जाळून टाकण्यात आली. चार चाकी गाड्या फोडण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. परंतु ही दंगल जेवढ्या तीव्रतेने भडकली, त्यावरून काही तरी राजकारण होतय का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण या ठिकाणच्या सामान्य नागरिकांना गेल्या वीस वर्षांत असा कुठलाच प्रकार दिसलेला नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने राजकारण करताना दिसत आहे. मात्र कुठलीही पार्श्‍वभूमी नसताना पालममध्ये हा प्रकार घडल्याने सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी सुमारे चारशे लोकांवर गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत आठ ते दहा लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पालम शहरात शांतता असून व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details