परभणी- तालुक्यातील सायळा खटिंग येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचास लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्यावतीने बांधण्यात आलेल्या गाळ्यांच्या बांधकामापोटी शिल्लक राहिलेली 42 हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी गुत्तेदाराजवळ 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. गुत्तेदाराने याप्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
परभणीत 10 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी उपसरपंचास अटक
सायळा खटिंग येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचास लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्यावतीने बांधण्यात आलेल्या गाळ्यांच्या बांधकामापोटी शिल्लक राहिलेली 42 हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी गुत्तेदाराजवळ 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. गुत्तेदाराने याप्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गाळे बांधकामासाठी खर्च केलेल्या रकमेचा धनादेश देण्यासाठी उपसरपंच लक्ष्मण वामनराव खटिंग याने लाचेच्या स्वरुपात गुत्तेदाराजवळ 10 हजार रुपयांची मागणी केली होती. गुत्तेदाराने याप्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी परभणी शहरात सापळा रचला. मात्र, खटाव स्वत: न येता त्याने त्याचा सहकारी विठ्ठल मारोतराव खटिंग याला अक्षदा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडलगत एका चहाच्या टपरीवर पाठवले. परंतु या ठिकाणी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान, त्याच्यासह उपसरपंच लक्ष्मण खटिंग विरूध्द नवामोंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, कर्मचारी जमील जहागिरदार, मिलींद हनुमंते, शेख मुखीद, अविनाश पवार, माणिक चट्टे, सारिका टेहरे, सावित्री दंडवते, भालचंद्र बोके यांच्या पथकाने ही कारवाई केली.