परभणी - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने रविवारी हे आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, परभणीत सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध - सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध
दिल्लीमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची काही समाज कटंकांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत देखील शिवसेना तसेच युवासेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
दिल्लीमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची काही समाज कटंकांकडून विटंबना करण्यात आली. ही विटंबना काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयुआयने केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत देखील शिवसेना तसेच युवासेनेच्यावतीने निषेध केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधींच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख संभानाथ काळे, युवासेनेचे शहरप्रमुख विशू डहाळे, विभागप्रमुख उद्धव मोहिते, उपशरप्रमुख राहुल खटींग, सुभाष जोंधळे, स्वप्नील भारती, गणेश मुळे आदींसह शिवसैनिक आणि युवासैनिक सहभागी झाले होते.