महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याकडून ६ हजाराची लाच घेताना वरीष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ज्ञानोबा सोनबा काळे (वय ४९) असे या लाचखोर लिपीकाचे नाव आहे. तो नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत आहे.

वरीष्ठ लिपीकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

By

Published : Jul 19, 2019, 12:32 PM IST

परभणी - नैसर्गिक आपत्तीत जळून खाक झालेल्या शेतातील आखाड्यावरील मालमत्तेची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयातील एका वरीष्ठ लिपिकाने शेतकऱ्याला ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु, ही लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या लाचखोर लिपिकाला रंगेहात पकडले आहे.

वरीष्ठ लिपिकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

ज्ञानोबा सोनबा काळे (वय ४९) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तो नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत आहे. त्याने तक्रारदार शेतकऱ्याला शेतातील आखाड्यात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून देण्यासाठी ६ हजार रुपये मागितले होते. मिळालेल्या माहितीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी पाथरी तहसील कार्यालय येथे सापळा रचला. यात पंचासमोर ६ हजार रुपयांची लाच घेताना काळे यास रंगेहात पकडले.

काळे याच्याकडून लाचेचे पैसे हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, मिलींद हनुमंते, अनिरूध्द कुलकर्णी, अविनाश पवार आणि सचिन धबडे यांनी कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details