महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईबाबा जन्मस्थळ वाद; शिर्डीकरांना उत्तर देण्यासाठी पाथरी संस्थांची कृती समितीची घोषणा

साईबाबांच्या जन्मस्थळावरून पाथरी आणि शिर्डीकरांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. ज्या ज्या वेळी पाथरीच्या विकासाचा मुद्दा पुढे येतो; त्यावेळीच  हा वाद निर्माण केला जातो, असा आरोप पाथरीकरांनी केला आहे.

saibaba's birthplace dispute
साईबाबा जन्मस्थळ वाद; शिर्डीकरांना उत्तर देण्यासाठी पाथरी संस्थांची कृती समिती घोषणा

By

Published : Jan 17, 2020, 10:29 AM IST

परभणी- साईबाबांच्या जन्मस्थळावरून पाथरी आणि शिर्डीकरांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. ज्या-ज्या वेळी पाथरीच्या विकासाचा मुद्दा पुढे येतो; त्यावेळीच हा वाद निर्माण केला जातो, असा आरोप पाथरीकरांनी केला आहे. त्यामुळे आता शिर्डीकरांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पाथरी येथील जन्मस्थळ मंदिराचे विश्वस्त आणि सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

साईबाबा जन्मस्थळ वाद; शिर्डीकरांना उत्तर देण्यासाठी पाथरी संस्थांची कृती समिती घोषणा

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. यामध्ये पाथरीमधील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी 100 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला.

मात्र, शिर्डीतून या विकास आराखड्याला सोबतच संबंधित जागेला जन्मभूमी म्हणण्यालाच विरोध झाला. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे विश्वस्त आमदार बाबाजानी दुर्राणी, संजय भुसारी, अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, मुंजाजी भाले पाटील व शहरातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षीय नेते यांची एक बैठक पाथरीत पार पडली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि विश्वस्त संजय भुसारी यांनी साई जन्मभूमीबाबत भूमिका मांडली. तसेच या बैठकीत कृती समितीची घोषणा देखील करण्यात आली.

शिर्डी येथील नागरिकांनी केलेल्या विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कृती समिती असणार आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि विश्वस्तांचा समावेश असेल. या बैठकीला दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, अनिल नखाते, चक्रधर उगले, एकनाथ शिंदे, भावना नखाते, उपनगराध्यक्ष हनांन खान, गंगाधर गायकवाड, बी.बी. तळेकर यांच्यासह पाथरीतील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या साईबाबा जन्मस्थळ विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. मात्र जन्मस्थळावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात येत असल्याचे आमदार बाबाजानी म्हणाले.

'जेव्हा-जेव्हा पाथरीच्या विकासाचा मुद्दा येतो, त्यावेळी शिर्डीकर विनाकारण वाद निर्माण करतात, असा आरोप मंदिराचे विश्वस्त संजय भुसारी यांनी केला. साईबाबांचा जन्म पाथरीचा असल्याचे असंख्य पुरावे यापूर्वीही दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकाच गुरुचे भक्त असताना वाद नको, असा सबुरीचा सल्ला त्यांनी शिर्डीकरांना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details