परभणी - गेल्या काही वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेने शनिवारी परभणी अक्षरशः दुमदुमून गेली. संध्याकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेली ही शोभायात्रा वाजत गाजत रात्री १० वाजता शिवाजी चौकात पोहोचली. या शोभायात्रेत विविध प्रकारची नाट्यमंडळी, अश्व, ढोल पथक, गोंधळी, वासुदेव आणि महिला भगवे फेट्यांसह सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेतील श्रीरामांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
रामनवमीच्या मिरवणुकीने परभणी दुमदुमली - celebration in parbhani
परभणीत श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून शोभायात्रा काढण्यात येते. यावेळी या शोभायात्रेला विक्रमी असा प्रतिसाद मिळाला. या शोभायात्रेत अश्वावर विराजमान ११ मुली, याशिवाय मिल्ट्री वेषात बुलेटवर बसून सहभागी झालेल्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. याशिवाय धार्मिक देखावे आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नाट्य मंडळाकडून शिवपुराण आणि रामायणावर आधारित सजीव देखावा दाखवण्यात येत होता.
परभणीत श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून शोभायात्रा काढण्यात येते. यावेळी या शोभायात्रेला विक्रमी असा प्रतिसाद मिळाला. या शोभायात्रेत अश्वावर विराजमान ११ मुली, याशिवाय मिल्ट्री वेषात बुलेटवर बसून सहभागी झालेल्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. याशिवाय धार्मिक देखावे आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नाट्य मंडळाकडून शिवपुराण आणि रामायणावर आधारित सजीव देखावा दाखवण्यात येत होता. विविध भक्ती गीतांवर ही मंडळी नाच करून कला सादर करत होते. ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याशिवाय या मिरवणुकीत ५० फूट लांब तिरंगा ध्वज, १०० ध्वजधारी मुली आणि हजारो फेटे परिधान केलेल्या महिला देखील सहभागी झाल्या होत्या. याशिवाय लेझीम पथक खालसा मर्दानी खेळाचे पथक, २१ तुफान हलगी वादक, ७५ वारकरी पथक आणि पुण्याच्या रणवाद्य ढोलकी पथकाने मोठी रंगत आणली.
याप्रमाणेच या शोभायात्रेत राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचा सजीव देखावा देखील सादर करण्यात आला. सर्वात शेवटी प्रभु श्रीरामांची १४ फूट उंच मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळच्या शोभायात्रेत आतषबाजी आणि पुष्पवृष्टीने रंगत आणली. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नारायणचाळ, अष्टभूजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ मार्गे शनिवार बाजारातील रेणुकामाता मंदिरावर विसर्जित झाली.