परभणी - जम्मु-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथे सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्याविरोधात देशात तीव्र असंतोष पसरला आहे. परभणी आणि पूर्णा शहरात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
परभणीत शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला; पुलवामा हल्ल्याचा निषेध
पूर्णा शहरातही दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
परभणीत शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला
पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, नगरसेवक साहेब कदम यांच्या नेतृत्वात वीरजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पुर्वी, या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार दहशतवादी आदिल अहमद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक अॅड. राजेश भालेराव, राजेंद्र कामळू, शशिकांत खाकरे, सोमनाथ शिराळे, पंकज महाजन, पप्पू रोडगे, गजानन भाकरे सहभागी झाले होते.