परभणी - शहरातील एका गुटखा माफियाच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये ३ लाख ४१ हजाराच्या गुटख्यासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पोलिसांनी संबंधित गुटखा माफियाला अटक केली आहे.
परभणीत गुटखा माफियावर कारवाई, ३ लाखाच्या गुटख्यासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - गुटखा माफिया
शहरातील माळीवाडा भागातून बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीषकुमार देशमुख यांना त्या ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार देशमुख यांनी पथक तयार करून तत्काळ या भागात छापा टाकला.
शहरातील माळीवाडा भागातून बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीषकुमार देशमुख यांना त्या ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार देशमुख यांनी पथक तयार करून तत्काळ या भागात छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी एका बोलेरो गाडीतून सुगंधी पानमसाला येताना दिसला. हा माल डांग्या मोहल्यातील जमील अहेमद शेख हिराजीच्या घरात उतरण्यात येत होता. पोलिसांनी या घरात छापा मारून झडती घेतली. त्यावेळी घरातून सुगंधी तंबाखूचे २५० पॅकेट आढळून आले.
पोलिसांना आणखी संशय आल्याने त्यांनी घरातील अडगळीच्या खोलीत पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी केसरयुक्त गोवा १ हजार गुटख्याचे ८२ पॉकेट्स, प्रीमियम आरएमडी पानमसाल्याचे ७ बॉक्स (४२० पॅकेट्स), सेंटेड टोबॅको गोल्ड ६ बॉक्स (४८० पॅकेट्स), राजनीगंधा ४० बॉक्स असा एकूण ३ लाख ४१ हजार ७४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित गुटखामाफिया जमील अहेमद शेख हिराजी याला अटक करून त्याच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे करीत आहेत.
मागिल महिनाभरातील ही चौथी ते पाचवी कारवाई आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई होत असली तरी गुटखा माफियावर अंकुश बसत नाही. त्यामुळे पोलिसांनी अजून कडक पाऊले उचलावी, अशी अपेक्षा परभणीकर व्यक्त करत आहेत.