महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांची धाड - परभणी विधानसभा मतदारसंघ

परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. औरंगाबाद येथील गणेश पाटील या व्यक्तीने सुरेश नागरे यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे होती.

सुरेश नागरे यांचे घर

By

Published : Oct 20, 2019, 11:28 AM IST

परभणी - परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. नागरे यांच्या जिंतूर रोडवरील घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली


या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री अकरा वाजता निवडणूक पथकासह पोलिसांनी नागरेंच्या घरावर धाड टाकली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत पोलिसांनी घराची कसून झडती घेतली मात्र, घरात पैसे सापडले नाही. प्रचाराचे साहित्य आणि काही नवे कपडे आढळून आले. परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी डावलून रविराज देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करत सुरेश नागरे यांनी अपक्ष म्हणुन रिंगणात उडी घेतली. सुरूवातीपासूनच पैसेवाला उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू होती. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुरेश नागरे यांनी शहरातून जोरदार रॅली काढली.

हेही वाचा - पर्वतीमध्ये भाकरी फिरविण्याची हीच योग्य वेळ - डॉ अमोल कोल्हे

औरंगाबाद येथील गणेश पाटील या इसमाने सुरेश नागरे यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली. त्यानुसार परभणी विधानसभेच्या निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्या सुचनेवरून अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, मनपाचे लेखाधिकारी जाधव यांच्या पथकाने रात्री अकराच्या सुमारास नागरे यांच्या घरावर छापा मारला.

ABOUT THE AUTHOR

...view details