परभणी - कर्नाटक, तेलंगणासह परभणी तसेच गंगाखेड येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपासोबत चार साथीदार असल्याची माहिती पुढे आली असून, यामुळे दुचाकी चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
दशरथ अण्णा शिंदे (वय २५ रा. ज्ञानेश्वर नगर पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने परभणी शहरातील न्यायालय परिसरातून एक दुचाकी चोरली होती. त्यानंतर गंगाखेड शहर, तेलंगणा तसेच कर्नाटकातून प्रत्येकी एक दुचाकी चोरून आणली होती. आरोपी हा सेलू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.