परभणी - शहरात नागरिकत्व कायद्याला विरोध करत काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत परभणीचे तहसीलदार जखमी झाले आहेत. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या चेहऱ्यावर एक दगड येऊन लागल्याने त्यांच्या ओठाला सात टाके पडले आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
CAA Protest : दगडफेकीत परभणीचे तहसीलदार जखमी; ओठाला पडले ७ टाके - police lathicharge in parbhani
तहसीलदार कडवकर यांच्याशिवाय काही पोलिसांनाही किरकोळ स्वरूपात दगड लागले आहेत. तसेच काही आंदोलक सुद्धा यामध्ये जखमी झाले आहेत. पोलिसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाले आहेत.
येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज जमलेल्या आंदोलकांनी मोर्चानंतर हिंसक रूप धारण केले होते. यातील एका टोळक्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात दगडफेक केली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेले परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना यातील एक दगड लागला. चेहऱ्यावर हा दगड लागल्याने त्यांच्या ओठाला गंभीर इजा झाली. पोलिसांनी तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. या ठिकाणी त्यांना सात टाके पडले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, तहसीलदार कडवकर यांच्याशिवाय काही पोलिसांनाही किरकोळ स्वरूपात दगड लागले आहेत. तसेच काही आंदोलक सुद्धा यामध्ये जखमी झाले आहेत. पोलिसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाले आहेत.