महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साप चावल्याने रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू, मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेमुळे तणाव - Parbhani Police News

जिंतूर तालुक्यातील येलदरी वसाहत येथे एका तरुणास बुधवारी रात्री साप चावला. मात्र, रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

parbhani-snakebite-patient-died-due-to-non-treatment
साप चावल्याने रुग्णाचा उपचारा अभावी मृत्यू

By

Published : Dec 26, 2019, 10:13 PM IST

परभणी -जिंतूर तालुक्यातील येलदरी वसाहत येथे एका तरुणाला बुधवारी रात्री साप चावला. मात्र, येलदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे या तरुणाला योग्य उपचार मिळाले नाहीत. परिणामी, या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे आज दोषी डॉक्टरांवर कारवायी होईपर्यंत तरुणाचा मृतदेह येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून न हलवण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, त्यानंतरही बराच काळ डॉक्टर न आल्याने त्या ठिकाणच्या डॉक्टरांना बडतर्फ करा, अशी मागणी करत नातेवाईकांनी आज दुपारनंतरही दवाखान्यात ठिय्या मांडला होता.

साप चावल्याने रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू

हेही वाचा - परभणीच्या धर्मापुरीत बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

येलदरी येथील मच्छिमार मारुती उत्तमराव वाकळे (वय.38, रा. येलदरी कॅम्प) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण 25 तारखेला रात्री 9 च्या दरम्यान राहत्या घराजवळ उभा असताना त्याला विषारी साप चावला. त्यानंतर नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी त्याला तत्काळ येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, येलदरी येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी श्रीनिवास घुगे उपस्थित नव्हते. त्यामुळे रुग्णाला तत्काळ जिंतूर येथे नेण्यात आले. मात्र, याही ठिकाणी त्याला योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला परभणी येथे नेत असतानाच झरी येथे त्याचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टर उपलब्ध न झाल्याने योग्य उपचाराअभावी एका विवाहीत तरुणाला आपले प्राण गमवावे लागले.

हेही वाचा - मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; वातावरणातील थंडी ओसरली

त्याच्या मागे पत्नी व तीन अपत्य यांच्यासह आई-वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. हा तरुण घरातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे या कुटुंबातील आधारच गेला आहे. मृत व्यक्तीचे नातेवाईक व गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या देऊन बसले होते. मात्र, घटनास्थळी आलेल्या जिंतूर पोलिसांनी याप्रकरणी दोषींवर निश्‍चितपणे गुन्हे दाखल करून कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आपले आंदोलन मागे घेऊन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details