महाराष्ट्र

maharashtra

कोरोना अपडेट : माहिती लपविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By

Published : Apr 6, 2020, 11:48 PM IST

परभणी जिल्ह्यातील जे नागरिक मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते अशा सर्व नागरिकांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घ्यावी. प्रशासनाला माहिती न देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिला आहे.

Parbhani collector
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

परभणी - जिल्ह्यातील जे नागरिक मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते किंवा तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आले आहेत, अशा सर्व नागरिकांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घ्यावी. परंतू ही माहिती दडवून ठेवणारे तथा प्रशासनाला माहिती न देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिला आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसला तरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पसरलेले लोन परभणीत येऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

याच अनुषंगाने आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेऊन माहिती लपवणाऱ्या नागरिकांना इशारा दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी दि.म.मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

यावेळी ते म्हणाले, 'सुदैवाने जिल्हयात आजपर्यंत एकही रुग्ण कोरोना बाधीत झालेला नाही. भविष्यात देखील होऊ नये, याकरिता कठोर आणि कडक उपाय अंगीकारावे लागतील, अशा सूचना दिल्या. दरम्यान, निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून नागरिकांनी हजेरी लावली आहे. या घटनेनंतर मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात (02452 - 223458) संपर्कप्रमुख आशिष आहेर (9689997113) यांच्याशी स्वतः संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी.

जे नागरिक स्वतःहून तपासणी करणार नाहीत किंवा दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या नागरिकांच्या किंवा कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांच्या संपर्कात आले, असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनास देणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, डॉ.किशोर सुरवसे, डॉ.रमेश खंदारे, डॉ.कल्पना सावंत, सर्व महसुल अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी 'तात्काळ प्रतिसाद पथक तयार करावे, दोन आशा सेविकांचे एक पथक तयार करुन, चार पथकामागे एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिवेक्षक तयार करुन एका पथकाने प्रती दिन 50 घरांची पाहणी करुन अहवाल सादर करावा, संशयीत रुग्णाचे सव्हेंक्षण करावे, मायक्रो नियोजन तात्काळ करुन सज्ज राहावे, हे काम आपण सर्वजन स्वत:साठी आणि समाजासाठी करणार आहोत, तेंव्हा मी या विभागाचा नाही, मी त्या विभागाचा, हे काम माझे नाही, असे काहीही चालनार नाही, असा देखील इशारा त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details