महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संकलन केंद्रावर बँड लावून आंदोलन

पाथरी तालुक्यातील शासनाचे दुध संकलन आणि शितकेंद्रावर दर दिवशी तीस हजार लिटर दूध संकलित करून शितकरण केले जाते. मात्र, दुधात प्रोटीन कमी असल्याचे कारण देत या संकलन केंद्रातील कर्मचारी शेतकऱ्यांचे हजारो लिटर दूध नाकारत आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी बँड लावून आंदोलन केले.

आंदोलन

By

Published : Jul 23, 2019, 8:08 AM IST

Updated : Jul 23, 2019, 1:49 PM IST

परभणी - पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या दुधात प्रोटीन कमी असल्याचे कारण देत, दूध उत्पादक संस्थांचे रोज हजारो लिटर दूध येथील दुध शितकरण केंद्रावरून परत पाठविल्या जात आहे. यामुळे दुष्काळाने पिचलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणात अधिकारीच तपासणीसाठी चुकीची रसायने वापरून शेतकऱ्यांना बदनाम करत असल्याची तक्रार घेवून सोमवारी शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर बँड वाजवून आंदोलन केले. यावेळी तपासणीसाठी आलेल्या मुंबईच्या पथकासमोरच शेतकऱ्यांनी बँड लावून गाईचे दुध काढत सत्यता तपासण्याची मागणी देखील केली.

शेतकऱ्यांचे दुध संकलन आणि शितकेंद्रावर आंदोलन


परभणी जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. शेती पिकत नसल्याने चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. आता दुधावरच त्यांच्या लेकरा-बाळांचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यामुळे आमच्या ताटात माती टाकू नका, अशी अशी भावनिक व्यथा देखील यावेळी शेतकऱ्यांनी मांडली.


पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शासनाचे दुध संकलन आणि शितकेंद्र आहे. या केंद्रावर दर दिवशी तीस हजार लिटर दूध संकलित करून शितकरण केले जाते. मात्र, दुधात प्रोटीन कमी असल्याचे कारण देत या संकलन केंद्रातील कर्मचारी शेतकऱ्यांचे हजारो लिटर दूध नाकारत आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी बँड लावून आंदोलन केले. आगोदरच शेतकऱ्यांना दुधाचे तीन महिण्यापासूनचे पैसे मिळाले नाही, त्यात दुधही नाकारले जात आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची ही साखळीच शेतकरी विरोधी भूमिका घेत त्यांना भिकेला लावण्यास अथवा आत्महात्येस प्रवृत्त करत असल्याचा आरोप शेतकरी करत होते.


दरम्यान, सोमवारी मुंबई येथून शिंदे आणि पठाण नावाचे अधिकारी दुधाच्या तपासणीसाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी बँड लावून गाईला आणले आणि अधिकाऱ्यांसमक्ष दूध काढुन त्याची तपासणी करण्यास सांगीतले. यावेळी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला होता. शेतकरी सांगत होते की, याठिकाणी चुकीची मानके वापरत दुधाची तपासणी केली जाते, येथे योग्य गुणवत्ता असलेले कर्मचारी नाहीत. अधिकारी आणि कर्मचारऱ्यांची पुर्ण साखळीच दूध भेसळ करुन शासनाची दिशाभूल करत आमच्या ताटात माती कालवण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकरी जाहिररित्या करत आहेत.


यावर्षी दीड महिन्यात केवळ ११५ मीमी पाऊस झाला आहे. पिके करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचे आणि चाऱ्याचे मोठे हाल आहेत. अशातच दुधावर उपजीविका सुरू असताना दर दिवशी शेतकऱ्यांचे हजारो लिटर दूध परत केले जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांचे दूध विनाअट खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात तालुक्यातील विविध दुध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

Last Updated : Jul 23, 2019, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details