परभणी -सर्वसामान्यपणे शेळी 2 ते 3 पिलांना जन्म देते. मात्र पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील माणिक शिंदे या शेतकऱ्याच्या शेळीने तब्बल 6 पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अबब...! शेळीने दिला तब्बल 6 पिल्लांना जन्म - आश्चर्य
पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील माणिक शिंदे या शेतकऱयाच्या शेळीने तब्बल 6 पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अरे बापरे...! शेळीने दिला 6 पिल्लांना जन्म
निसर्गाची लिला काही औरच असते. नेहमी एक, दोन, तीन आणि अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळी विषयी ऐकण्यात आले असेल. मात्र रविवारी देवनांद्रा येथील माणिक शिंदे यांच्या शेळीने चक्क सहा पिलांना जन्म दिला आहे. यात पाच बोकड असून एक पाठ आहे. हे सर्व पिल्लं आणि शेळी देखील सुखरूप आहेत. त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे. या विषयी गावात माहिती मिळताच हे कुतूहल पाहण्यासाठी शिंदे यांच्या शेतात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
Last Updated : Jul 9, 2019, 10:34 AM IST