महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांनीच केली हत्या; पूर्णा पोलिसांकडून मारेकरी अटकेत - मित्रानीच केली तरुणाची हत्या

दारूच्या वादातून दोन मित्रांनीच आपल्या एका मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना परभणीत घडली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पूर्णा पोलिसांनी अटक केली आहे.

Murder  in parbhani
दारूच्या वादातून एकाचा हत्या

By

Published : Sep 25, 2020, 3:31 PM IST

परभणी - दारू का पाजत नाहीस, दारूसाठी पैसे का देत नाहीस, असे म्हणत एका युवकाचा दोन मित्रांनी खून केल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी रात्री पूर्णा शहरात झालेल्या या हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना पूर्णा पोलिसांनी आज दुपारी अटक केली आहे.

दारूच्या वादातून एकाचा हत्या
नितिन गणेश खर्गखराटे असे हत्त्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो पूर्णा येथील हरीनगरमधील रहिवासी आहे. नितीनला त्याचे मित्र विकास बापूराव चौदन्ते व रोशननाथा इंगोले या दोघांनी फोन करून तू दारू पाजत नाहीस, दारूसाठी पैसे देत नाहीस, असे म्हणत दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर ते सर्वजण रेल्वे वसाहतीजवळील मैदानावर दारू प्यायले. त्यानंतर नितीन याच्यासोबत वाद घालत त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण केली. रस्त्यावर खाली पडलेल्यानितीनचेरोशन इंगोले याने हात धरले तर विकास चौदन्ते याने तीक्ष्ण हत्याराने मानेवर चार-पाच वार केले. यामुळे नितीनचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी दीपिका गणेश खर्गखराटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आज सकाळी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवून दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details