महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात, मतदारांची कसरत - mud form at polling center parbhani

सखी मतदान केंद्र फुगे आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. आकर्षक रांगोळ्या काढून मतदान केंद्राची शोभा वाढविण्यात आली. तसेच येणाऱ्या प्रत्येक मतदाराला पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. मात्र, ही सर्व सजावट आणि स्वागत यावर पावसामुळे पाणी फेरले आहे.

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात

By

Published : Oct 21, 2019, 5:12 PM IST

परभणी- मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. यासाठी सखी आणि आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे हेच सखी मतदान केंद्र अक्षरशः पाणी आणि चिखलाच्या दलदलीत रुतले आहे. त्यामुळे फुले आणि फुग्यांनी सजवलेल्या या केंद्रात प्रत्येक मतदाराला कसरत करत वाट काढावी लागत आहे.

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात, मतदारांची कसरत

परभणी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 1 सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी महिला असून बंदोबस्तासाठी देखील महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एकता नगरातील गांधी विद्यालय या शाळेच्या मतदान केंद्रावर संपूर्ण महिलाराज असलेले सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परभणीत परतीचा पाऊस सुरू आहे. या मतदान केंद्राच्या समोर मैदानावर प्रचंड पाणी साचले असून चिखल तयार झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मतदारांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. मतदानासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहावयास मिळते.

सखी मतदान केंद्र फुगे आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. आकर्षक रांगोळ्या काढून मतदान केंद्राची शोभा वाढविण्यात आली. तसेच येणाऱ्या प्रत्येक मतदाराला पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. मात्र, ही सर्व सजावट आणि स्वागत यावर पावसामुळे पाणी फेरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details