महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'70:30' चा प्रश्न मार्गी, आता लढा परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी- खासदार संजय जाधव

मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा 70:30 चा फार्म्युला रद्द करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीतून आंदोलन उभारण्यात आले होते. या संदर्भात आज वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी परभणीत पत्रकार परिषद घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच सरकारचे अभिनंदन केले.

खासदार संजय जाधव
खासदार संजय जाधव

By

Published : Sep 8, 2020, 6:10 PM IST

परभणी - वैद्यकीय प्रवेशासाठीचे 70:30 चे सूत्र रद्द करावे, यासाठी परभणीतून सुरू झालेल्या आंदोलनाला मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून यश आले आहे. यानंतर आता जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी उभारलेला लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा 70:30 चा फार्म्युला रद्द करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीतून आंदोलन उभारण्यात आले होते. या संदर्भात आज वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी परभणीत पत्रकार परिषद घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच सरकारचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले, 'हे सूत्र रद्द झाल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर आता खऱ्या अर्थाने अन्याय दूर झाला आहे. हा विषय मराठवाड्याचा होता, पण आता परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अजूनही बाकी आहे. यासाठी सर्व पक्ष नेत्यांना घेऊन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. परभणीचे वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करावे, अशी मागणी लावून धरणार आहोत.

हेही वाचा-उपचार मिळत नसल्याने कोरोनाचे रूग्ण मरत आहेत; शशिकांत शिंदे यांचा सरकारला घरचा आहेर

उस्मानाबादला मेडिकल कॉलेज जाहीर झाले असले तरी ते परभणीच्या मेडिकल कॉलेजच्या मागणी करण्यापूर्वीचे आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादला केवळ 200 खाटांचे सरकारी य इस्पितळ आहे. परभणीत मात्र तब्बल साडेपाचशे खाटांचे सरकारी रुग्णालय आहे. परभणी ही महापालिका आहे. तर परभणीचे सरकारी रुग्णालय हे महाराष्ट्रातील नंबर तीनचे सर्वाधिक खाटा असलेले रुग्णालय आहे. त्यामुळे या धर्तीवर या ठिकाणचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. कोरोनाच्या धर्तीवर तरी ही मागणी आता पूर्ण झाली पाहिजे, यासाठी आपण आता सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. दिल्लीचे अधिवेशन झाल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मोट बांधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. ही मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरणार आहोत, असेही खासदार संजय जाधव म्हणाले.

हेही वाचा-विधानपरिषदेतही सत्ताधारी अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत विरोधात आक्रमक

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठाकडे आपण जागा मागितली आहे. यासाठी विद्यापीठाचे प्रशासन 11 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीत गोरक्षणचीदेखील जागा उपलब्ध आहे. सध्या जागेचा प्रश्न नाही. परभणीच्या जिल्हा रुग्णालयातही हे महाविद्यालय तात्काळ सुरू होऊ शकते, असेही खासदार जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details