परभणी- एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पाथरी पोलीस ठाण्यात गेलेले अॅड. उत्तम डोंगरे यांना ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकानी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पाथरीच्या वकील संघाने मंगळवारी (15 मे) न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सदर पोलिसावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
मारहाणीच्या निषेधार्थ वकिलांचा बहिष्कार; पाथरीच्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी - giriraj bhagat
पोलीस उपनिरीक्षकानी वकिलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ परभणी वकील संघाने कामकाजावर बहिष्कार टाकून उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.
एक महिला तिच्यावर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात १० मे रोजी पाथरीच्या पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली होती. याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित महिलेकडून अॅड. डोंगरे यांनी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हा गुन्हा दाखल करण्यास पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काझी यांनी विरोध केला.
यावेळी काझी यांनी अॅड. डोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना लाथ मारून ठाण्याबाहेर हाकलून दिले, असा आरोप डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणात कुठलीही कारवाई न झाल्याने पाथरीच्या वकील संघाने मंगळवारी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून पाथरीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ज्यामध्ये काझी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.