परभणी- जिंतूरचे सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने आज 2 लाख 12 हजार 620 रुपयांचा गुटखा एका वाहनातून जप्त केला. जिंतूर येथील बलसा रोडवरील नदीवर सापळा लावून पोलिसांनी एका मालवाहू जीपमधून हा गुटखा पकडला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या काही दिवसात पोलिसांनी गुटख्याच्या चोरट्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. त्यानुसार याबाबत देखील सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना माहिती मिळाली होती. त्यांनी मोईनोद्दीन इफतेखान पठाण, काळे, सूर्यवंशी, पवार, गोरे या कर्मचार्यांचे पथक तयार करून संशयित वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
या पथकास बलसारोडवरील पुलावर सायंकाळी एक मालवाहू जीप (एम एच 29 टी 5304) येताना दिसली. त्या जीपमध्ये चालकासह अन्य एक जण व्यक्ती होती. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, त्याने शेख फयाज शेख एजाज तांबोळी (रा. नूरानी कॉलनी, जिंतूर), असे सांगितले. याच दरम्यान वाहनचालक सिद्दीक बागवान (रा. चपराशी कॉलनी, जिंतूर), हा तेथून पळून गेला.
'एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त'
पथकाने पीकअप वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात गुटख्याचे सहा गोण्या ज्याची किंमत 1 लाख 79 हजार 200, या शिवाय 33 हाजर 5580 रुपये किंमतीचा पान मसाला सापडला, असा एकूण 2 लाख 12 हजार 120 रुपयांचा हा सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याशिवाय अडीच लाख रुपये किंमतीची मालवाहू जीप, असा एकूण 4 लाख 62 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मोईनोद्दीन पठाण यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -'कृषी विद्यापीठांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष'; 'लेखणीबंद' सुरूच